विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST2021-04-25T04:19:00+5:302021-04-25T04:19:00+5:30

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथे पाण्याची विद्युत मोटार उचलीत असताना ५२ वर्षीय व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ...

52-year-old man dies of electric shock | विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

कुरूम : मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम माना येथे पाण्याची विद्युत मोटार उचलीत असताना ५२ वर्षीय व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पो.स्टे. माना येथे मर्ग दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीवरून, ग्राम माना येथील रहिवासी मृतक नरेंद्र दुर्योधन जामनिक (५२) यांनी त्यांच्या घराच्या बांधकामावर पाण्याच्या टाकीतून इलेक्ट्रिक मोटार लावून पाणी टाकले. मोटार उचलीत असताना नरेंद्र जामनिक यांना विजेचा जबर धक्का लागला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणात मृताचा मामेभाऊ मोहन डोमाजी चक्रे (रा.माना) यांच्या तक्रारीवरून माना पोलीस स्टेशनला मर्ग दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे याच्या मार्गदर्शनात हे.कॉ. पंजाबराव इंगळे, पो.कॉ. चेतन राऊत करीत आहेत.

Web Title: 52-year-old man dies of electric shock