गायगावजवळील शेतातून ५00 लिटर रॉकेल जप्त

By Admin | Updated: February 5, 2016 02:11 IST2016-02-05T02:11:26+5:302016-02-05T02:11:26+5:30

रॉकेलची बाजारातील किंमत ४५ हजार रुपये.

500 liters of kerosene seized from the fields near Gagagaon | गायगावजवळील शेतातून ५00 लिटर रॉकेल जप्त

गायगावजवळील शेतातून ५00 लिटर रॉकेल जप्त

अकोला: गायगावजवळील अल्लू पहिलवान यांच्या शेतालगत डाबकी रोड पोलिसांनी छापा घालून खुल्या बाजारात नेण्यात येणारे ५00 लिटर रॉकेल पोलिसांनी जप्त केले. आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. गायगावजवळ अल्लू पहिलवान यांचे शेत आहे. या शेतालगत सोनटक्के प्लॉटमध्ये राहणारा हमीद खान खैराती हा रॉकेल खुल्या बाजारात विक्रीस नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला आणि घटनास्थळाहून ५00 लिटर रॉकेलचे भरलेले चार ड्रम जप्त केले. जप्त केलेल्या रॉकेलची बाजारातील किंमत ४५ हजार रुपये आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी हमीद खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी हमीद हा घटनास्थळाहून फरार झाला. गायगाव येथे पेट्रोल, डिझेल व रॉकेलचे डेपो आहेत. या डेपोमधून पेट्रोल, डिझेल व रॉकेलची मोठय़ा प्रमाणात चोरी करण्यात येते. रॅकेटच्या माध्यमातून चोरीचे पेट्रोल, रॉकेलचा शहरात काळाबाजार केला जातो.

Web Title: 500 liters of kerosene seized from the fields near Gagagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.