५00 वीज ग्राहकांना दीड वर्षापासून देयके नाही
By Admin | Updated: September 26, 2014 23:47 IST2014-09-26T23:47:13+5:302014-09-26T23:47:13+5:30
शेलूबाजार महावितरण कार्यालयाचा प्रताप.

५00 वीज ग्राहकांना दीड वर्षापासून देयके नाही
साहेबराव राठोड / मंगरुळपीर (वाशिम)
मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार महावितरण कार्यालय अंर्तंगत येत असलेल्या गावातील जवळपास ५00 वीज ग्राहकांना मागील एक दिड वर्षांंपासुन विज देयके मिळत नसल्याचा प्रकार उघडीस आला आहे. हा प्रकार महावितरण कार्यालयासाठी डोके दुखी ठरू लागला आहे. यात महत्वाचे म्हणजे एका गिट्टी खदान ला सुध्दा गत दिड वर्षांंपासुन वीज देयक मिळाले नसल्याने या मागचे कारण काय असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे.तालुक्यातील शेलूबाजार महावितरण कार्यालया अंर्तगत येत असलेल्या गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात विज कनेक्शन मिळावे म्हणुन रितसर अर्ज सादर केले होते.कंपनी कडुन विज जोडणी मिळाली परंतु त्या ग्राहकांना वर्ष दिड वर्ष उलटुनही देयके मिळाली नाही.त्यानंतर ग्राहकांनी महावितरणकडे वीज देयके मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल केल्या. या प्रकारमुळे तात्कालीन अभियंत्यांनी मोठय़ा प्रमाणावर घोळ केल्याचे वीज ग्राहकांच्या तक्रारी वरून दिसुन येत आहे.येवढेच नव्हेतर कंझरा शिवारातील एक गिट्टी खदान वर विज जोडणी होवुन जवळपास दिड वर्षाचा काळ उलटुन गेला तरी देखील त्यांना देयके मिळाली नसल्याचे वास्तव्य समोर आले आहे.
महावितरणचे सहायक अभियंता सुशिल जयस्वाल यांनी विभागीय व स्थानिक पथक तयार करुन ज्या ग्राहकांना विजेची देयक मिळत नाहीत अशांचा शोध घेवून त्यांना वीज देयक देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगीतले.