जाळीचा देव येथील ५0 जणांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 20, 2015 02:22 IST2015-11-20T02:22:05+5:302015-11-20T02:22:05+5:30

श्री चक्रधर स्वामी मंदिराचा वाद.

50 people booked for nets | जाळीचा देव येथील ५0 जणांवर गुन्हा दाखल

जाळीचा देव येथील ५0 जणांवर गुन्हा दाखल

धाड (जि. बुलडाणा): श्री चक्रधर स्वामींच्या मंदिराच्या कारणावरून या मंदिराचे ट्रस्टी असणारे महंत नागराज संतमुनी शास्त्री (वय ६२) रा. कपालपूर, ता. श्रीरामपूर यांनी आपल्यावर हल्ला करून मारहाण केल्याबाबत आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून जाळीचा देव येथील ५0 जणांविरुद्ध धाड पोलिसात तक्रार दिली. यावरून धाड पोलिसांनी अनिल उदरभरे, अशोक आंबेकर, राजू उदरभरे, भिवन उदरभरे, मधुकर उदरभरे यांच्यासह इतर ४५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये आज गुन्हे दाखल केले आहेत. प्राप्त माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील श्री चक्रधर स्वामी जाळीचा देव श्रीक्षेत्र मंदिराचा वाद असून, १७ नोव्हेंबर पूर्वी ग्राम मढ, ता. बुलडाणा फाटा येथे जाळीचा देव मंदिरावरून परतताना वाटेत वरील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस मारहाण करीत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्यांनी धाड पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: 50 people booked for nets