शाळांमध्ये शिक्षकांची राहणार ५० टक्के उपस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:26+5:302021-06-18T04:14:26+5:30

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुद्धा शिक्षकांची शाळांमध्ये ५० ...

50% attendance of teachers in schools! | शाळांमध्ये शिक्षकांची राहणार ५० टक्के उपस्थिती!

शाळांमध्ये शिक्षकांची राहणार ५० टक्के उपस्थिती!

शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सुद्धा शिक्षकांची शाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीबाबत निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे खबरदारी व उपाययोजना शाळांनी कराव्यात.

-डॉ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती राहणार आहे. केवळ दहावी व बारावीच्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना १०० टक्के उपस्थित राहावे लागणार आहे.

-दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

कोरोनामुळे उपाययोजना कराव्यात

कोरोनाचा प्रभाव ओसरला असला तरी, कोरोना कमी झालेला नाही. त्यामुळे शाळा मुख्याध्यापकांनी शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. ५० टक्के उपस्थिती असली तरी, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

शाळांमधील उपस्थितीबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. शिक्षण संचालकांनी ५० टक्के उपस्थितीबाबत निर्देश दिले आहेत. परंतु सध्या उपस्थितीबाबत संभ्रम आहे.

-सुवर्णा वरोकार, शिक्षिका दादासाहेब दिवेकर शाळा

शिक्षकांच्या उपस्थितीबाबत संभ्रम आहे. शिक्षण संचालकांनी शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबत पत्र काढले आहे. परंतु, अद्यापपर्यंत जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून उपस्थितीबाबत सूचना नाहीत. त्यामुळे शाळेत किती शिक्षकांनी उपस्थित राहावे, हा प्रश्न आहे.

-पुंडलिक भदे, मुख्याध्यापक जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा कट्यार

शिक्षक- १२,९६८

शिक्षकेतर- ५३०५

जिल्ह्यातील शाळा- १८६८

जि. प. शाळा- ९१२

अनुदानित शाळा- ६७४

विनाअनुदानित शाळा- २८२

Web Title: 50% attendance of teachers in schools!