जिल्ह्यात बियाणांचे ५, तर कीटकनाशकांचे ३ नमुने अप्रमाणित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:05+5:302021-07-10T04:14:05+5:30
खरीप व रब्बी हंगामात कृषी सेवा केंद्रांकडून बियाणे, खतांची विक्री केली जाते. तसेच कृषी विभागाकडून खते, बियाणांची मागणी केली ...

जिल्ह्यात बियाणांचे ५, तर कीटकनाशकांचे ३ नमुने अप्रमाणित!
खरीप व रब्बी हंगामात कृषी सेवा केंद्रांकडून बियाणे, खतांची विक्री केली जाते. तसेच कृषी विभागाकडून खते, बियाणांची मागणी केली जाते. बियाणे, खते चांगल्या दर्जाची मिळावीत यासाठी दरवर्षी पथकांकडून बियाणांचे नमुने काढून त्यांची तपासणी केली जाते. यावर्षीही तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बियाणांचे १२१, रासायनिक खते ६२ आणि कीटकनाशकांचे २६ नमुने तपासणीचे लक्ष्यांक कृषी विभागाला आहे. या तपासणीत काही नमुने निकृष्ट आढळून आले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. कृषी विभागाने बियाणांचे १११, तर कीटकनाशकांचे २५ नमुने घेतले आहेत. यामध्ये बियाणांचे ५, तर कीटकनाशकांचे ३ नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. यामध्ये एक प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे.
खतांचे ४१ नमुने प्रमाणित
कृषी विभागाने निविष्ठा विक्री दुकानांच्या केलेल्या पाहणीत खतांचे ५३ नमुने तपासले. यामध्ये ४१ नमुने प्रमाणित निघाले, तर उर्वरित नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. खतांचा एकही नमुना अप्रमाणित निघाला नाही.
कृषी विभागाने घेतलेले नमुने...
बियाणे १११
खते ५३
कीटकनाशके २५
जिल्हा परिषदेच्या पथकाने घेतले १७० नमुने
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सातही तालुक्यांत तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत १२९ आणि जिल्हास्तरीय पथकांमार्फत ४१ असे बियाणांचे एकूण १७० नमुने घेण्यात आले. विविध बियाणांचे घेण्यात आलेले नमुने नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.