५ कोटी ७0 लाखांचा दंड
By Admin | Updated: March 22, 2016 02:15 IST2016-03-22T02:15:02+5:302016-03-22T02:15:02+5:30
अवैध वीटभट्टय़ा प्रकरणी वीटभट्टीधारकांना आकारला पाचपट दंड.

५ कोटी ७0 लाखांचा दंड
आकोट: तालुक्यातील अवैध वीटभट्टीधारकांना ५ कोटी ७0 लाख १८ हजार रुपये एवढा पाचपट दंड आकारण्यात आला आहे. दंडाचा आदेश उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्या आदेशावरून तहसीलदारांनी २0 मार्च रोजी जारी केला.
मातीची रॉयल्टी भरण्यासंदर्भात चोहोट्टाबाजार परिसरातील गावात असलेल्या वीटभट्टीधारकांना नोटीस देण्यात आली होती. प्रशासनाला रॉयल्टीपोटी १ कोटी ४५ लाख रुपये अपेक्षित होते. मात्र केवळ ६५ लाख वसुली जमा झाली. रॉयल्टी भरण्यात येत नसल्याने महसूल विभागाने नोटीस बजावल्या. मात्र वारंवार नोटीस बाजवल्यानंतरही रॉयल्टी भरणा होत नव्हता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी १८ मार्च रोजी दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश प्रभारी तहसीलदारांना दिला. त्यानुसार मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पंचनामानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) नुसार बाजारभावाचे रॉयल्टी न भरणार्या २१ वीटभट्टीधारकांना पाचपट दंड करण्यात येत असल्याचे तहसीलदार अशोक गीते यांनी आदेश जारी केला. २१ वीटभट्टीधारकांना ११0५0 ब्रास पोटी ५,७0,१८000 रुपये पावपट दंडाची रक्कम वसुलीचे आदेश आहेत.
दंड प्रतिब्रास मातीचा बाजारभाव, बाजारभावाप्रमाणे पाचपट दंड व स्वामित्वधनाची रक्कम याप्रमाणे आकारण्यात आला आहे.