हातगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी ४७.७0 टक्के मतदान
By Admin | Updated: August 29, 2016 01:32 IST2016-08-29T01:32:17+5:302016-08-29T01:32:17+5:30
आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित.

हातगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीसाठी ४७.७0 टक्के मतदान
मूर्तिजापूर / हातगाव(जि. अकोला) दि. २८: अकोला जिल्हा परिषदेच्या हातगाव जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत केवळ ४७.७0 टक्के एवढे अल्प मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी मूर्तिजापूर येथे सकाळी १0 वाजता सुरू होणार आहे. दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल अपेक्षित आहे.
हातगाव जिल्हा परिषद गटातून यापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले भारिप-बहुजन महासंघाचे जि.प. सदस्य रवींद्र महदेवराव गोपकर यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारिप-बमसंने सम्राट डोंगरदिवे, शिवसेनेने विनोद सदाफळे, राष्ट्रवादी काँग्रेसने भास्कर जाधव यांना उमेदवारी दिली. दिवंगत जि.प. सदस्य रवींद्र गोपकर यांचे बंधू सुरेश गोपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले. या चार उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.
२८ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत २४ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यात मतदारांचा फारसा उत्साह दिसून आला नाही. या मतदारसंघात पुरुष ९,५१७ व महिला ८,८८५ असे एकूण १८,४0२ मतदार आहे. त्यापैकी ५,0९६ व ३,६८२ महिला अशा एकूण ८,७७४ मतदारांनी मतदान केले. अशाप्रकारे ४७.७0 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भारिप-बमसं पक्ष त्यांच्याकडे पूर्वी असलेला हा मतदारसंघ राखतो काय की अन्य पक्षाचा उमेदवार उमेदवार भारिप-बमसंच्या गडावर त्यांचा झेंडा फडकवणार, याकडे जिल्ह्यातील राजकीय नेते, कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागले आहे.