४६७ उमेदवारांनी दिली परीक्षा

By Admin | Updated: November 9, 2014 00:41 IST2014-11-09T00:34:40+5:302014-11-09T00:41:18+5:30

अकोला जिल्हा परिषद भरती प्रक्रिया: २४९ उमेदवार गैरहजर.

467 candidates gave the examination | ४६७ उमेदवारांनी दिली परीक्षा

४६७ उमेदवारांनी दिली परीक्षा

अकोला: जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत एक औषध निर्माण अधिकारी आणि २0 आरोग्यसेवक (पुरुष) अशा एकूण २१ पदांसाठी शनिवारी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी एकूण ७१६ उमेदवारांपैकी ४१६ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, उर्वरित २४९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. जिल्हा परिषदेच्या विविध विभागात वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत दोन कनिष्ठ अभियंता पदांसाठी गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांसाठी शनिवारी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक औषध निर्माण अधिकारी पदासाठी सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यालय या केंद्रावर सकाळी १0 ते ११.३0 या वेळेत लेखी परीक्षा घेण्यात आली. औषध निर्माण अधिकारी या एका पदासाठी १२६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. उर्वरित ३४ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. या परीक्षेनंतर शनिवारी दुपारी २ ते ३.३0 वाजता २0 आरोग्यसेवक (महिला) पदांसाठी सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या विद्यालय व शिवाजी महाविद्यालय या दोन केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी ५९0 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३७५ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली असून, उर्वरित २१५ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. एकूण २१ पदांसाठी ४६७ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, २४९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. पेपर तपासणीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुणानुक्रमे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

*आज ग्रामसेवक पदांसाठी परीक्षा!

         जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत ११ कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 ते ११.३0 या वेळत लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ग्रामसेवकांच्या ११ पदांसाठी १ हजार ५७ अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत.

Web Title: 467 candidates gave the examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.