अप्रमाणित खताची ४५२ पोती सील!

By Admin | Updated: May 19, 2017 00:59 IST2017-05-19T00:59:34+5:302017-05-19T00:59:34+5:30

पिंजर (अकोला) : येथील एका कृषी सेवा केंद्रावरील प्रयोग शाळेने अप्रमाणित केलेल्या खतांना विक्रीस बंदी केली असून, कृषी विभागाने ४१२ पोते सील केले आहेत.

452 bags of uncertified fertilizer seal! | अप्रमाणित खताची ४५२ पोती सील!

अप्रमाणित खताची ४५२ पोती सील!

पिंजर (अकोला) : येथील एका कृषी सेवा केंद्रावरील प्रयोग शाळेने अप्रमाणित केलेल्या खतांना विक्रीस बंदी केली असून, कृषी विभागाने ४१२ पोते सील केले आहेत.
दरवर्षीप्रमाणे पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी येथील सर्व कृषी सेवा केंद्राकडून खतांचे नमुने घेतले. यामध्ये येथील साई कृषी सेवा केंद्रावर विक्रीस असलेले नर्मदा बायोफेम कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट हे खत अमरावती येथील प्रयोगशाळेने नापास ठरविल्याने कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी येथील ४१२ पोत्यांचा साठा सील करून विक्रीस बंदी घातली. दरम्यान याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा कृषी अधिकारी यांना माहिती दिली असून, कंपनीनेसुद्धा खताचे नमुने दुसऱ्या प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यासाठी अर्ज केला असून, पुढील आदेशापर्यंत सील केलेल्या साठ्याला विक्री बंदी केली आहे.

येथील कृषी केंद्रावरून नर्मदा बायोफेम कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट हे खत प्रयोगशाळेने अप्रमाणित केल्याने त्यास विक्री बंद केली असून, सदर साठा जप्त करण्यात आला आहे.
- एस. टी. चांदूरकर, कृषी अधिकारी, पं. स. बार्शीटाकळी.

Web Title: 452 bags of uncertified fertilizer seal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.