खासगी सावकारांकडून ४५ कोटींच्यावर कर्ज वितरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:44+5:302021-05-07T04:19:44+5:30

कहाळेकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील खासगी सावकारांनी ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तारण ठेवून शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्ज वाटप केल्याची ...

45 crore loan disbursement from private lenders! | खासगी सावकारांकडून ४५ कोटींच्यावर कर्ज वितरण!

खासगी सावकारांकडून ४५ कोटींच्यावर कर्ज वितरण!

कहाळेकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खासगी सावकारांनी ४५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम तारण ठेवून शेतकऱ्यांसह नागरिकांना कर्ज वाटप केल्याची माहिती कहाळेकर यांनी दिली असून, त्या कर्जाचा व्याजदर हा बँक व पतसंस्थांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध नव्हती. आता ही सुविधा सुरू करण्यात आली असून, नागरी पतसंस्थांमध्ये अल्प व्याजदरामध्ये सोने तारण कर्ज तातडीने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी खासगी सावकारांकडे न जाता, बँक किंवा पतसंस्थेमधूनच कर्ज घ्यावे व सोने तारण मिळण्यास काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालय अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी केले आहे.

Web Title: 45 crore loan disbursement from private lenders!