शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मानव मिशन अंतर्गत मालेगावात ४४३ विद्यार्थीनींना मिळणार सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:56 IST

मालेगाव तालुक्यात १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींना १५ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या सायकलींचे वितरण होणार आहे.

- अमोल कल्याणकर  मालेगाव (वाशिम) : ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना प्रवास येणाºया अडचणी लक्षात घेता मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात येते. या अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी मालेगाव तालुक्यात १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींना १५ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या सायकलींचे वितरण होणार आहे. मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ग्रामीण भागांतून शहरे किंवा नजिकच्या खेड्यांत शिक्षणासाठी येजा करणाºया विद्यार्थीनींसाठी मोफत बससेवा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू आहे. तथापि, काही ठिकाणी या बसफेºया जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित भागातील विद्यार्थीनींना शैक्षणिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, तसेच त्यांची सुरक्षाही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शालेय प्रवासासाठी विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी पंचायत समितीस्तरावरून प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. त्यानुसार पंचायत समितीच्यावतीने मालेगाव तालुक्यातील शाळा आणि विद्यार्थीनींची पडताळणी करून १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींसाठी १५ लाख ५० हजार ५०० रुपये खर्चाचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे पाठविला आहे.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी