४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:26 AM2017-09-16T01:26:15+5:302017-09-16T01:26:28+5:30

अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.

44 villages have not reached water tanker! | ४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

४४ गावांपर्यंत पोहोचले नाही टँकरद्वारे पाणी!

Next
ठळक मुद्देटंचाईग्रस्त ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश गत आठवड्यात जिल्हाधिकार्‍यांनी दिला; मात्र शुक्रवारपर्यंत ६१ पैकी ४४ गावांपर्यंत टँॅकरद्वारे पाणी पोहोचलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याची बाब समोर येत आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. 
त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 
त्यानुषंगाने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गत ७ सप्टेंबर रोजी दिला. आठवडाभराच्या कालावधीत ६१ पैकी केवळ १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी उर्वरित पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांना मात्र १५ सप्टेंबरपर्यंत टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त या गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याने टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा होत असल्याचे चित्र आहे.

४५ पैकी १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा!
पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना पाच शासकीय आणि ४0 खासगी अशा एकूण ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला असला, तरी आठवडा उलटूनही केवळ १७ टँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांतील ग्रामस्थांपर्यंत टँकरद्वारे पाणी शुक्रवारपर्यंंत पोहोचले नसल्याची स्थिती आहे.

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत १७ टँॅकरद्वारे १७ गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. १६ सप्टेंबरपासून आणखी पाच गावांना टँॅकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
- राजेश्‍वर हांडे,
तहसीलदार, अकोला.

Web Title: 44 villages have not reached water tanker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.