शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बाळापूर-पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्य अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 11:13 IST

जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.

अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्ह्यातील बाळापूरपातूर या दोन तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ४३ सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २४ सप्टेंबर रोजी दिला. अपात्र ठरलेल्या सदस्यांमध्ये एक सरपंचाचादेखील समावेश आहे. त्यामुळे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणे संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना चांगलेच भोवले.ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र संबंधित तहसीलदारांकडे सादर करणे बंधनकारक आहे. विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांना दिला होता. त्यानुसार बाळापूरपातूर या दोन तालुक्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल बाळापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी गत आठवड्यात जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानुषंगाने आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया बाळापुर व पातूर तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. अपात्र ठरविण्यात आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये पातूर तालुक्यातील एक सरपंचाचादेखील समावेश आहे.तालुकानिहाय अपात्र ठरलेले असे आहेत सदस्य!तालुका                    सदस्यपातूर                        २४बाळापूर                    १९..................................एकूण                      ४३अकोला तालुक्यातील ४८ सदस्यांची सुनावणी!ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण जागांवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय कार्यालयात ठेवण्यात आली होती. त्यापैकी उपस्थित ४८ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी घेण्यात आली असून, गैरहजर राहिलेल्या ३७ सदस्यांची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी सांगितले.

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायतBalapurबाळापूरPaturपातूर