तेल्हारा येथील शिबिरात ४२ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:13+5:302021-01-13T04:47:13+5:30

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला यांच्या हस्ते सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. या ...

42 people donated blood in the camp at Telhara | तेल्हारा येथील शिबिरात ४२ जणांनी केले रक्तदान

तेल्हारा येथील शिबिरात ४२ जणांनी केले रक्तदान

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बेनीप्रसाद झुनझुनवाला यांच्या हस्ते सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी, व्यवस्थापक गोपालदास मल्ल, कोषाध्यक्ष विठ्ठल खारोडे, संचालक विष्णू मल्ल, संचालक विक्रम जोशी, संचालिका अश्विनी खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्त संकलन करण्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉ. सरिता गोरे, शालिग्राम गिरे व वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तापडिया यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. प्राचार्य राजेंद्रकुमार देशमुख, उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा, पर्यवेक्षक गोपाल फाफट यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रक्तदान शिबिरामध्ये ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी शासकीय जिल्हा रक्तपेढीच्या डॉ. सरिता गोरे व शिल्पा तायडेंसह चमूने संस्थेचे आभार मानले. (फोटो)

Web Title: 42 people donated blood in the camp at Telhara