लोकसभा निवडणुकीनंतर ३५ हजार मतदार वाढले!
By Admin | Updated: August 5, 2014 00:55 IST2014-08-05T00:55:02+5:302014-08-05T00:55:02+5:30
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या जाहीर

लोकसभा निवडणुकीनंतर ३५ हजार मतदार वाढले!
अकोला : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या १४ लाख १३ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या ९ जूनपूर्वी जिल्ह्यातील आकोट, अकोला पश्चिम, अकोला पूर्व, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या १३ लाख ७८ हजार ३४७ एवढी होती. गेल्या ९ ते ३0 जूनदरम्यान मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. तसेच चुकीची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघातील अद्ययावत मतदार याद्या ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात ३४ हजार ८९0 मतदारांची वाढ झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या १४ लाख १३ हजार २३७ इतकी झाली आहे. ८४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या! अकोला : आजमितीस अकोला जिल्हयाती ८४ टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत; परंतु पावसाने पुन्हा दीर्घ विश्रांती घेतल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांची गती मंदावली आहे. या विभागात सर्वाधिक १२ लाख ९८ हजार १00 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आता या विभागातील शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ९१ टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी पेरणी केली आहे. अमरावती ८६ टक्के, वाशिम ८३ टक्के, अकोला ८४ व बुलडाणा जिल्ह्यात ७४ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. तथापि, मागील वर्षीपेक्षा हे क्षेत्र कमी असले तरी शेतकर्यांनी यावर्षी प्रथम पसंती सोयाबीनलाच दिली आहे. कापसाचा पेराही वाढला असून, या पाच जिल्हय़ात कापसाचे क्षेत्र यावर्षी ८ लाख ९९ हजार ४00 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. तुरीचे क्षेत्रदेखील वाढले असून, ३ लाख ५ हजार हेक्टरवर तूर पेरणी झाली आहे. तथापि, यावर्षी मूग पेरणीची वेळ निघून गेली असतानाही या पाच जिल्हय़ात ५६ हजार २00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडिदाची पेरणी घटली असून, २४,४00 हेक्टर क्षेत्रावर या पिकाचा पेरा शेतकर्यांनी केला आहे. ज्वारीची ६८,६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.