३५ लाखांच्या रुई गाठीचे गौडबंगाल?

By Admin | Updated: June 14, 2017 02:05 IST2017-06-14T02:05:16+5:302017-06-14T02:05:16+5:30

२०० रुईगाठी नियोजित स्थळी न पोहोचल्यामुळे दोन ट्रकचालकांनी परस्पर लंपास केल्याच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांत ट्रकचालकांविरुद्ध ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

35 lakh rupees are worth the Godbangal? | ३५ लाखांच्या रुई गाठीचे गौडबंगाल?

३५ लाखांच्या रुई गाठीचे गौडबंगाल?

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट जिनिंग प्रेसिंगमधून ३५ लाख रुपयांच्या २०० रुईगाठी नियोजित स्थळी न पोहोचल्यामुळे दोन ट्रकचालकांनी परस्पर लंपास केल्याच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांत ट्रकचालकांविरुद्ध ११ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, रुई गाठींचा कंपनीकडून विमा काढण्यात येतो. त्यामुळे पोलिसांनी या लंपास झालेल्या रुई गाठींचा गौडबंगाल शोधून या प्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावणे आवश्यक झाले आहे.
हिवरखेड मार्गावरील गजानन जिनिंग पे्रसिंग फॅक्टरी व रामदेवबाबा कॉट्स स्पिन येथे अदिलाबाद येथील सालासर या निर्यातदार कंपनीसोबत २०० गाठींचा ३४ लाख ९८ हजार ९७९ रुपयांचा स्पॉट सौदा झाला. त्यानंतर सालासार कंपनीचे प्रतिनिधी कासम बशिरोद्दीन चव्हाण यांच्यासमक्ष या जिनिंगमधून २९ मे रोजी दोन ट्रकमध्ये प्रत्येकी १०० रुईगाठी भरून हे ट्रक सुयश कमोडिटिज प्रा. लि. स्वार पाटील वेअर हाऊस उरण मुंबई या पत्त्यावर सालासर कंपनीमार्फत पाठविण्यात आल्या. नंतर जिनिंग प्रेसिंगचा संबंध या व्यवहारातून संपला; परंतु कासम बशिरोद्दीन चव्हाण यांनी सदर रुईगाठी भरून रवाना केलेला ट्रक नियोजित स्थळी १ जून रोजी चौकशी केली असता पोहोचले नाहीत. त्यामुळे कासम बशिरोद्दीन चव्हाण यांनी अकोट पोलीस ठाण्यात एमएच ०४ एएफ २७४७ व एमएच ४३ यू ५९०५ क्रमांकाचा ट्रकचालक राकेशकुमार राजकुमार चर्च याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी ११ जूनच्या उशिरा रात्री ट्रकचालक राकेशकुमार चर्च व दुसऱ्या अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध भादंविचे कमल ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, अनेकदा अनुचित घटना लक्षात घेता रुई गाठींसंदर्भात मार्जिन विमा उतरविण्यात येत असतो, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा मोबदला मिळतो. त्यामुळे पोलिसांनी रुई गाठीच्या लंपास प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे झाले आहे.

Web Title: 35 lakh rupees are worth the Godbangal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.