क्रमांक व कागदपत्रे नसलेल्या ३५ दुचाकी जप्त
By Admin | Updated: April 20, 2016 02:10 IST2016-04-20T02:10:37+5:302016-04-20T02:10:37+5:30
ऑटो डीलमधील वाहनांची पोलिसांनी केली तपासणी

क्रमांक व कागदपत्रे नसलेल्या ३५ दुचाकी जप्त
अकोला: जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणार्या शहरा तील १0 ऑटोडील्सची मंगळवारी पोलिसांनी अचानक तपासणी केली. विनाक्रमांकाच्या, दस्तावेज नसलेल्या आणि वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्या ३५ दुचाकी या तपासणीत जप्त करण्यात आल्या. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑटोडील्समधील वाहनांसदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोन महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सर्व ऑटोडील्सचे काम बंद केले होते; मात्र त्यानंतर हा व्यवसाय पुन्हा सुरू झाला असून, मंगळवारी १0 ऑटोडील्समधील वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्या. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे, रामदासपेठचे ठाणेदार सुभाष माकोडे व शहर वाहतूक शाखेचे प्रकाश सावकार यांनी या ऑटोडील्समधील वाहनांची मंगळवारी दिवसभर तपासणी केली. या तपासणीत १९१ दुचाकी आणि १३ चारचाकी वाहनांचे दस्तावेज व इतर तपासणी करण्यात आली. त्यानंतर ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या.