शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

जिल्हय़ात ३४ हजार दशलक्ष घनमीटर पाणीसाठय़ाची कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:43 AM

अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियान ३२५ गावांत ८0५५ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांच्या कालावधीत जिल्हय़ात ३२५ गावांमध्ये ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध करणारी ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.राज्यात वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन २0१५-१६ या वर्षात अकोला जिल्हय़ात २00 गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ६ हजार ७४८ कामे पूर्ण करण्यात आली. ९३ कोटी १५ लाख रुपये खर्च करून करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांद्वारे २२ हजार ५९९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. सन २0१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात १२५ गावांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २ हजार ७६४ प्रस्तावित कामांपैकी १ हजार ३0७ कामे पूर्ण करण्यात आली. २९ कोटी २४ लाख रुपये खर्च करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या या कामांतून ११ हजार ९३८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सन २0१५-१६ व २0१६-१७ या  दोन वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील ३२५ गावांमध्ये ८ हजार ५५ कामे पूर्ण करण्यात आली असून, या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

१४४ गावांसाठी ८६ कोटींचा आराखडा!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१७-१८ या वर्षात जिल्हय़ातील १४४ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यासाठी ३ हजार ४२७ कामांकरिता ८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा आराखडा कृषी विभागामार्फत तयार करण्यात आला आहे.

४९ हजार १३३ हेक्टर संरक्षित ओलिताचा लाभ!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत जिल्हय़ात पूर्ण करण्यात आलेल्या कामांद्वारे ३४ हजार ५३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या पाणीसाठय़ाचा जिल्हय़ातील ४९ हजार १३३ हेक्टर शेती क्षेत्राला संरक्षित ओलीतासाठी लाभ होणार आहे.

‘जलयुक्त शिवार’ विभागीय बैठक; पुरस्कार वितरण सोहळा आज अकोल्यात!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अमरावती विभागीय आढावा बैठक आणि पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६, २0१६-१७ या दोन वर्षांतील अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांतील कामांचा आढावा आणि २0१७-१८ मधील कामांच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल यासंदर्भात सकाळी १0 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. आढावा बैठकीनंतर दुपारी ४ वाजता  पुरस्कार वितरण सोहळ्याला मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह विभागातील पाचही जिल्हय़ांचे पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार