जिल्ह्यात ३२ बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:37+5:302021-07-16T04:14:37+5:30

सांडपाणी, डबक्यांमुळे आजारांत वाढ अकोला : गावातील नाल्या अनेक ठिकाणी बुजल्या आहेत. परिणामी, सांडपाणी तुंबत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढत ...

32 buses started in the district | जिल्ह्यात ३२ बसेस सुरू

जिल्ह्यात ३२ बसेस सुरू

सांडपाणी, डबक्यांमुळे आजारांत वाढ

अकोला : गावातील नाल्या अनेक ठिकाणी बुजल्या आहेत. परिणामी, सांडपाणी तुंबत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. डासांची उत्पत्ती वाढत असल्याने विविध आजारांनी डोके वर काढले.

फास्ट फुडमुळे आजारांना निमंत्रण

अकोला : शहरासह ग्रामीण भागातही फास्ट फुडचे चलन वाढत आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. उघड्यावरील फास्टफुडमुळे पोटाचे विकार वाढल्याचे दिसून येत आहे.

रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प

अकोला : लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात रोजगार सेवकांना अल्प मानधनावर काम करावे लागत आहे. कोरोना संकटात ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात रोजगार हमीची कामे करण्यात आली. परिणामी रोजगार सेवकांना संकटाचा सामना करावा लागला.

शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी!

अकोला : दोन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणाऱ्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. जिल्ह्यात २ हजार ५३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे.

Web Title: 32 buses started in the district