शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याच्या विलगीकरणासाठी महापालिकांना ३१ मार्चची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 13:22 IST

अकोला: घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला महापालिकांनी ‘खो’ दिल्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महापालिकांना मार्च २०१९ पर्यंत कचऱ्याचे १०० टक्के विलगीकरण करून कंपोस्टींग करण्याची मुदत दिली आहे

अकोला: घनकचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला महापालिकांनी ‘खो’ दिल्याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने महापालिकांना मार्च २०१९ पर्यंत कचऱ्याचे १०० टक्के विलगीकरण करून कंपोस्टींग करण्याची मुदत दिली आहे. यादरम्यान, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प न उभारणाºया महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशारा नगर विकास विभागाने दिला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौच करणाºया नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याचे महापालिका व नगर परिषदांना केंद्र व राज्य शासनाचे निर्देश होते. शौचालय बांधून देण्याच्या बदल्यात केंद्र, राज्य व स्वायत्त संस्थांनी पात्र लाभार्थींना अनुदान दिले. २०१५ ते २०१७ या कालावधीत शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी १ मे २०१७ पासून ‘कचरा लाख मोलाचा’ मोहीम सुरु केली. यासंदर्भात शासनाने मागील दोन वर्षांच्या कालावधीत सातत्याने पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत कचºयाच्या विलगीकरणासाठी महापालिकांच्या स्तरावर ठोस प्रयत्न होत नसल्याचे आढळून आले आहे. याप्रकाराची दखल घेत नगर विकास विभागाने महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांना ३१ मार्च पर्यंत कचºयाचे विलगीकरण करून कंपोस्टींग करण्याची मुदत दिली आहे.उत्पन्नात वाढ करण्याचे निर्देशउत्पन्नवाढीसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ठोस अंमलबजावणी करीत नसल्याचे चित्र आहे. ‘ड’वर्ग महापालिकांमध्ये कर्मचाºयांचे तीन-तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने उत्पन्नात वाढ करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. मालमत्ता कर व इतर करांची ९० टक्के वसूली करण्याचे निर्देश आहेत.रॅँकिंगमध्ये सुधारणा करा!स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत केंद्र शासनाच्या चमूने केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील शहरांच्या मानांकनात (रॅँकिंग) सुधारणा झाली होती. आता स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ मध्ये सर्वेक्षणादरम्यान रॅँकिंगमध्ये अधिक सुधारणा करण्याचे महापालिकांना निर्देश आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका