जिल्हय़ातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:36 IST2017-08-26T01:35:28+5:302017-08-26T01:36:35+5:30
गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या अभियानामध्ये जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे. जिल्हयातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

जिल्हय़ातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘एक गाव, एक गणपती’ या अभियानामध्ये जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्यात येणार आहे. जिल्हयातील ३१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी अनेक गावांमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधीक गणपती स्थापन करण्यात येतात. एकापेक्षा अधिक गणपतींची स्थापना केल्यानंतर अखेरच्या दिवशी दोन मंडळांमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाद्वारे ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना मांडण्यात आली. यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाला अकोला जिल्हय़ात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
शहरात २६४ मंडळे
शहरामध्ये २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंद केली आहे. या २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलीस प्रशासन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अकोला शहरात २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी करण्यात आली असून, जिल्हय़ातील आकडेवारी शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाली नव्हती.
‘एक मंडळ, एक पोलीस कर्मचारी’
अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे ‘एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, एक पोलीस कर्मचारी’ ही आगळी-वेगळी संकल्पना राबविण्यात आली आहे. यामध्ये अकोला शहरातील २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना २६४ पोलीस कर्मचारी समन्वय साधण्यासाठी देण्यात आलेले आहेत. हे पोलीस कर्मचारी पोलीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार असून ते मंडळाच्या पदाधिकार्यांना कायदेशीर मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हय़ातील ३१0 गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करण्यात येणार आहे. यासोबतच शहरातही २६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नोंदणी केली असून, त्यांना एक कर्मचारी समन्वय साधण्यासाठी देण्यात आलेला आहे. अकोला शहर वगळता जिल्हय़ातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही मोठय़ा उत्साहाने यामध्ये सहभागी झाले असून, हा उत्सव भक्तिभावाने, आनंदात व शांततेच्या मार्गाने साजरा करावा.
- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला.