‘एमपीएससी’च्या परीक्षेला ३0९ उमेदवार गैरहजर
By Admin | Updated: July 28, 2014 01:55 IST2014-07-28T01:33:01+5:302014-07-28T01:55:35+5:30
अकोल्यातील १३ केंद्रांवर ३ हजार ६१ उमेदवारांनी दिली परीक्षा.

‘एमपीएससी’च्या परीक्षेला ३0९ उमेदवार गैरहजर
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) लिपिक-टंकलेखक पदांसाठी रविवार, २७ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. अकोला शहरातील १३ केंद्रांवर ३ हजार ६१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली असून, ३0९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते.
अकोल्यातील बी.आर. हायस्कूल, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, भारत विद्यालय, जागृती विद्यालय, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्या शाळा, न्यू इंग्लिश हायस्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, आरएलटी विज्ञान महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट व आरडीजी महिला महाविद्यालय इत्यादी १३ केंद्रांवर रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ह्यएमपीएससीह्णची परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३ हजार ३७0 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३ हजार ६१ उमेदवारांनी संबंधित केंद्रांवर ही परीक्षा दिली असून, उर्वरित ३0९ उमेदवार परीक्षेला गैरहजर होते. परीक्षेच्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परीक्षा केंद्रांवर १३ केंद्रप्रमुख, ५३ पर्यवेक्षक, १७१ समवेक्षक व ३ समन्वय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली होती.