पातूर तालुक्यात ३0 हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: December 8, 2014 01:13 IST2014-12-08T01:13:13+5:302014-12-08T01:13:13+5:30

तुलंगा येथे विशेष पथकाची कारवाई.

30 thousand gutkha seized in Patur taluka | पातूर तालुक्यात ३0 हजारांचा गुटखा जप्त

पातूर तालुक्यात ३0 हजारांचा गुटखा जप्त

खेट्री(पातूर) : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यां तर्गत येणार्‍या तुलंगा येथे छापा घालून ३0 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडील मारूती व्हॅन जप्त केली. ही कारवाई रविवारी दुपारी करण्यात आली.
विशेष पथकाला बुलडाणा जिल्हय़ातील चिखली येथून मारूती व्हॅनमध्ये गुटखा येत असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकाने मारूती व्हॅन तुलंगा गावात येताच, छापा घातला आणि व्हॅनमधील ३0 हजार रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी चिखली येथील आरोपी सय्यद जलील सय्यद शफीक (२३) आणि पातूर तालुक्यातील खेट्री येथील मनोहर किसन पाचपोर (३७) यांना अटक केली. पोलिसांनी एमएच २८ व्ही. ११६५ क्रमांकाची मारूती व्हॅन जप्त केली. ही कारवाई विशेष पथकाचे एपीआय सचिन जाधव, संदीप तराळे, नीलेश गाडगे, बापूराव चव्हाण, राज चंदेल, इरफान अली यांनी केली.

Web Title: 30 thousand gutkha seized in Patur taluka