३ कोटीची थकीत जमा करा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:25 IST2020-02-04T14:25:11+5:302020-02-04T14:25:20+5:30
३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली आहे.

३ कोटीची थकीत जमा करा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद
अकोला : महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे थकीत ३ कोटी ५५ लक्ष रुपये तातडीने जमा न केल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीस सोमवारी पाटबंधारे विभागाने मनपाला जारी केली. पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर शहरात निर्माण होणाऱ्या परिस्थितीला महापालिका जबाबदार राहणार असल्याचा गर्भित इशाराही या विभागाने दिला आहे.
शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून (महान धरण) पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात शहरवासीयांसाठी २४ दलघमी पाणी आरक्षित आहे. पाणीपुरवठ्याच्या बदल्यात मनपा प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडे शुल्क जमा करणे भाग आहे. मनपाक डून सदर शुल्क जमा होत नसल्याचे पाहून सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला नोटीस जारी केली. यामध्ये ३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली आहे. थकीत रक्कम जमा न केल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करणार असल्याचे या विभागाने नमूद केले आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास शहरात उद्भवणाºया परिस्थितीला महापालिका जबाबदार राहील, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाच्या नोटीसची महापालिका प्रशासन कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.