३ माजी नगराध्यक्षासह ७ अधिका-यांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: February 12, 2015 01:28 IST2015-02-12T00:16:28+5:302015-02-12T01:28:41+5:30
मंगरुळपीर नगरपालिका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाचा आदेश.

३ माजी नगराध्यक्षासह ७ अधिका-यांवर गुन्हे दाखल
मंगरुळपीर (जि. वाशिम) : बोगस साहित्य खरेदी व बनावट दस्तवेज तयार करुन केलेल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने येथील तीन माजी नगराध्यक्षासह ७ अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज ११ फेब्रुवारी रोजी दिले आहेत. यामुळे राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे.
मंगरुळपीर नगर पालीकेत बोगस साहीत्य खरेदी व खोटे दस्तवेज बनवून आर्थिक अपहार केल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भगवान मिराजी पिसोळे यांनी दाखल केली होती. माजी नगराध्यक्ष बानो रहीम चौधरी, किरणताई अशोक परळीकर, अशोक महादेव परळीकर या तीन माजी नगराध्यक्षांसह तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी व्ही. बी. तिवाले, एस. यु. खानंदे, व्ही.आर. गुळवे, डी. टी. सोळंके, एस. एस. राठी, पी. एल. पवार, एस. सी. राठी या ७ अधिकार्यांविरोधात ही तक्रार होती. उपरोक्त पदाधिकारी व अधिकार्यांनी वर्तमानपत्रात जाहीरात देवून निविदा तयार केली व अनामत रक्कम शासनाकडे जमा केली नाही. अमरावती येथील संजय एजन्सी, माहेश्वरी एजन्सी, तिरुपती एजन्सी, फर्म यास निविदा दिल्याचे दाखवून खोटे साहीत्य खरेदी केले व शासनाचे खोटे दस्तवेज तयार करुन शासनाची फसवणूक केली अशी तक्रार पिसोळे यांनी मंगरुळपीर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन दहा जणांविरुद्ध पो.स्टे. मंगरुळपीर येथे अपराध क्रमांक एम. के. एस. नं. ४५/१५ नुसार कलम १६९, १६७, ४0३, ४0६, ४0९, ४१७, ४२0, ४६, ४६८ अधिक ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.