‘बेसिक कॉस्मेटोलॉजी’मध्ये २९ विद्यार्थ्यांंना मिळाला दिलासा!

By Admin | Updated: January 2, 2016 08:36 IST2016-01-02T08:36:30+5:302016-01-02T08:36:30+5:30

राज्याचा निकाल होता शून्य टक्के; परीक्षा शुल्क परतीवर अद्याप निर्णय नाही.

29 students get relief in 'Basic Cosmetology' | ‘बेसिक कॉस्मेटोलॉजी’मध्ये २९ विद्यार्थ्यांंना मिळाला दिलासा!

‘बेसिक कॉस्मेटोलॉजी’मध्ये २९ विद्यार्थ्यांंना मिळाला दिलासा!

अकोला : कौशल्य विकासावर आधारित 'बेसिक कॉस्मेटोलॉजी' अभ्यासक्रमाच्या नोव्हेंबरमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालाची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सुधारित निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये अकोल्यातील २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेंतर्गत मुलींसाठी कौशल्य विकासावर आधारित असलेल्या ह्यबेसिक कॉस्मेटोलॉजीह्ण अभ्यासक्रमाच्या जुलै २0१५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २ नोव्हेंबर २0१५ रोजी जाहीर करण्यात आला होता. संपूर्ण राज्यात या अभ्यासक्रमाची परीक्षा देणारे सर्वच विद्यार्थी ह्यट्रेड थिअरीह्ण या एकाच विषयात अनुत्तीर्ण दाखविण्यात आले होते. यामध्ये अकोल्यातील ४२ विद्यार्थ्यांंचा समावेश होता. वर्षभरात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांनी घातलेल्या गोंधळापाठोपाठ ह्यबेसिक कॉस्मेटोलॉजीह्ण अभ्यासक्रमाच्या निकालातही गोंधळ निर्माण झाला होता. शैक्षणिक नुकसान होईल, म्हणून विद्यार्थ्यांंनी संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने याबाबत पाठपुरावा केला होता. निकालातील चूक लक्षात येताच औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुंबईमार्फत पडताळणी करून ३१ डिसेंबर २0१५ रोजी सुधारित निकाल जाहीर करण्यात आला. 'बेसिक कॉस्मेटोलॉजी'च्या सुधारित निकालामध्ये अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (मुलींची) २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंना देखील सुधारित निकालामुळे दिलासा मिळाला आहे.

Web Title: 29 students get relief in 'Basic Cosmetology'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.