पाणी पुरवठय़ासाठी २८३ कोटी!

By Admin | Updated: August 3, 2016 02:16 IST2016-08-03T02:16:18+5:302016-08-03T02:16:18+5:30

अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा पुढाकार; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे सोपवला प्रस्ताव.

283 crore for water supply! | पाणी पुरवठय़ासाठी २८३ कोटी!

पाणी पुरवठय़ासाठी २८३ कोटी!

अकोला: अमृत योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २११ कोटींचा निधी मंजूर केला. यादरम्यान, महापालिकेची संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सुधारित डीपीआरतयार करण्याचे निर्देश देत मंगळवारी तब्बल २८३ कोटींचा नवीन प्रस्ताव पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना सादर केला.
केंद्र शासनाच्या ह्यअमृतह्णयोजनेंतर्गत अकोला शहराची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत खिळखिळी झालेली पाणीपुरवठा योजना सुरळीत करणे व त्यानंतर सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी ह्यअमृतह्णअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे करणे बंधनकारक असल्यामुळे २११ कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच पाणीपुरवठा योजनेचा ह्यडीपीआरह्ण(प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिले. त्यानुसार मजिप्राने प्रकल्प अहवाल तयार करण्याला सुरुवात केली. यादरम्यान, महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या. हद्दवाढीची अधिसूचना कोणत्याही क्षणी जारी होऊ शकते. त्यामुळे संभाव्य हद्दवाढ लक्षात घेऊन मनपात समाविष्ट होणार्‍या २४ गावांमधील पाणीपुरवठय़ाचाही प्रकल्प अहवालामध्ये समावेश करण्याचे निर्देश आमदार गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर तसेच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मजिप्राला दिले. लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून मजिप्राने २८३ कोटींचा सुधारित प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला. त्या पृष्ठभूमिवर मंगळवारी आ.शर्मा, आ.सावरकर व सभापती अग्रवाल यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन सुधारित प्रस्तावाचे निवेदन दिले.

Web Title: 283 crore for water supply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.