बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी २६ वर्षांनंतर गजाआड
By Admin | Updated: December 16, 2015 02:11 IST2015-12-16T02:11:07+5:302015-12-16T02:11:07+5:30
न्यायालयाने सुनावली होती शिक्षा

बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी २६ वर्षांनंतर गजाआड
बाश्रीटाकळी (अकोला): बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या फरार आरोपीला बाश्रीटाकळी पोलिसांनी तब्बल २६ वर्षांनंतर मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना १९८५साली गोटखेड जलालाबाद येथे घडली होती. याप्रकरणी अनिल खुशाल थोरातविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्याने उच्च न्यायालयाने आव्हान दिले; मात्र त्याची याचिका १९८९ साली फेटाळली होती. तेव्हापासून तो फरार होता. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला अकोला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायलयाने त्याची कारागृहात रवानगी केली. ही कारवाई ठाणेदार ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कोरचे, हेड कॉन्स्टेबल सुनील भटकर, बाळकृष्ण पवार, श्याम पेंदरे, मोरे यांनी केली.