तेल्हारा तालुक्यात २६ पोलिस पाटलांची पदे रिक्त
By Admin | Updated: July 10, 2014 01:30 IST2014-07-09T19:47:31+5:302014-07-10T01:30:13+5:30
तेल्हारा तालुक्यातील २६ पोलिस पाटील व ११ गावातील कोतवालाची पदे रिक्त आहे.

तेल्हारा तालुक्यात २६ पोलिस पाटलांची पदे रिक्त
तेल्हारा : प्रशासकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार्या व गावातील घटना घडामोडीची माहिती पुरवणार्या पोलिस पाटील पदाचे २६ गावांत तर ११ गावांत कोतवाल पद रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. गावातील होणार्या प्रत्येक घडामोडीची माहिती पोलिस व महसूल विभागास देऊन गावात शांतता भंग होऊ नये म्हणून खबरदारी घेणार्या पोलिस पाटील पद २६ गावांत रिक्त आहेत. यामध्ये तळेगाव बु., कार्ला बु., तळेगाव खुर्द, शिवाजीनगर, हिंगणी खु., उमरशेवळी, जितापूर, पिंपरखेड, चन्नापूर, मोहापाणी, भिली, बोरव्हा, नया खेडा, मालठाणा बु., पिंप्री खुर्द, डवला, बाभूळगाव, पिवंदळ, मनब्दा, तळेगाव, पातुर्डा, गाडेगाव, जाफ्रापूर, वाकोडी, शेरी बु., दापुरा या २६ गावांत पोलिस पाटील पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत तर ११ गावांत महसूल विभागाला माहिती पुरवणारे कोतवाल पद खंडाळा, अडगाव बु., मनब्दा, तेल्हारा खु., आकोली रुपराव, तेल्हारा बु., गाडेगाव, तळेगाव बाजार, खेलदेशपांडे, हिंगणी बु., मनात्री बु. येथील पद रिक्त आहे. पोलिस पाटील दाखल्यासाठी शाळकरी मुलांना व नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे तरी शासनाने तालुक्यातील पोलिस पाटील व कोतवाल पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे. शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी, आकोट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती पाठविण्यात आली असून, ही भरती जिल्हा स्तरावर होणार असून, पोलिस पाटील पदाची जाहिरात निघाल्यानंतर भरती करण्यात येणार असल्याचे सांगीतले.