२६ लाखांचा थकला कर : हिवरखेड ग्रामपंचायतने वीजउपकेंद्राला लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 18:56 IST2019-03-19T18:56:13+5:302019-03-19T18:56:54+5:30
हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले.

२६ लाखांचा थकला कर : हिवरखेड ग्रामपंचायतने वीजउपकेंद्राला लावले सील
हिवरखेड (अकोला) : गेल्या अनेक वर्षांपासून वर्षांपासून २६ लाख रुपयांचा इमारत कर थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने १९ मार्च रोजी हिवरखेड येथील वीज उपकेंद्राच्या इमारतीला सील लावले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.कर भरण्याविषयी वारंवार सुचना देउनही महावितरणने भरना न केल्याने ही कारवाई केली. यावेळी दोन कर्मचाऱ्यांनाही कोंडून ठेवण्यात आले होते. अखेर महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी कराची अर्धी रक्कम दहा दिवसात भरण्याचे आश्वासन दिल्याने उपकेंद्राचे सील दुपारी काढण्यात आले.
मागील अनेक वर्षांपासून हिवरखेड येथील वीज उपकेंद्राकडे कर थकाला होता. थकीत असलेल्या कराचे एकूण २६ लक्ष रुपये वसुलीसाठी वारंवार सूचना देऊनही महापारेषणद्वारे हिवरखेड ग्रामपंचायतचा कर भरण्यात आला नाही. त्यामुळे, शेवटी हिवरखेडच्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाºयांचा समवेत जाऊन महाराष्ट्र विज पारेषण कंपनीच्या हिवरखेड येथील १३२ केव्ही उपकेंद्राला सील ठोकले. यावेळी दोन कर्मचारी उपकेंद्रात कार्यरत असल्याने त्यांना सील लावण्याआधी बाहेर निघण्यास सांगण्यात आले. परंतु कर्तव्यावर असताना कार्यालय सोडता येणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने शेवटी त्यांना आतच कोंडून राहावे लागले.
महापारेषण केंद्राला सील ठोकण्याची वार्ता हवेसारखी पसरल्यामुळे एकच खळबळ उडाली. महापारेषणचे अधिकारी तात्काळ हजर झाले आणि ग्रामपंचायत प्रशासनासोबत या विषयावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.सदर बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता मनोज झाडे, कार्यकारी अभियंता मनोज तायडे आणि महापारेषणचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत सील परत काढण्याबाबत विनंती केली. यावेळी झालेल्या चर्चेवेळी सरपंच अरुणाताई ओंकारे, ग्रा.प. सदस्य सुरेश ओंकारे, रवींद्र वाकोडे, हिफाजत खान, अझीझ खान , सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज, यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
जोड आहे