२५२ मतमोजणी कर्मचार्यांना प्रशिक्षण २५ फेर्यांमध्ये मतमोजणी; आवश्यक साहित्याचे वाटप
By Admin | Updated: May 14, 2014 00:58 IST2014-05-13T22:55:44+5:302014-05-14T00:58:10+5:30
अकोला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मतमोजणी कर्मचार्यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले.

२५२ मतमोजणी कर्मचार्यांना प्रशिक्षण २५ फेर्यांमध्ये मतमोजणी; आवश्यक साहित्याचे वाटप
अकोला : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मतमोजणी कर्मचार्यांना मंगळवारी प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात आयोजित प्रशिक्षणामध्ये या कर्मचार्यांना अधिकार्यांनी मार्गदर्शन करून त्यांना आवश्यक साहित्यही वितरित केले.
अकोला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी करण्यात येणार असून, ८४ टेबलवर २५ फेर्यांमध्ये ही मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी २५२ कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, प्रमोद देशमुख, गजानन निपाने, शैलेष हिंगे व अशोक अमानकर यांनी कर्मचार्यांना मार्गदर्शन केले. मतमोजणी प्रक्रियेसाठी मतगणना पर्यवेक्षक, मतगणना सहाय्यक व स्थायी निरीक्षकांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शिंदे यांच्यामार्फत करण्यात आली आहे. मतमोजणी कर्मचार्यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले असून, आवश्यक साहित्याचे वितरणही करण्यात आले आहे. यामध्ये एका टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक व एक निरीक्षक अशा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांना मतमोजणी करण्याची प्रक्रिया सांगण्यात आली. या प्रशिक्षणाला मतमोजणी कर्मचारी उपस्थित होते.