२५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यास नामवंत शाळा निरुत्साही!
By Admin | Updated: March 29, 2016 02:31 IST2016-03-29T02:31:51+5:302016-03-29T02:31:51+5:30
अनेक शाळांमधील प्रवेश प्रक्रिया आटोपली, शिक्षण हक्क कायदा कागदावरच.

२५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यास नामवंत शाळा निरुत्साही!
नितीन गव्हाळे /अकोला
शिक्षण हक्क कायद्यानुसार गोरगरिबांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता; परंतु हा निर्णय राबविण्यास शहरातील नामवंत शाळा निरुत्साही असून, अनेक शाळांनी २५ टक्के मोफत प्रवेश देण्याच्या निर्णयाला बगल देत, शाळेतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली असल्याचे समोर आले आहे. या शाळांमध्ये ह्यनो अँडमिशनह्णचे फलकसुद्धा लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गोरगरीब पालकांसमोर मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी पालकांचे ह्यमिशन अँडमिशनह्ण सत्र सुरू झाले आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी भर उन्हात अनेक पालक शाळांच्या कार्यालयात चकरा मारत आहेत. पालकांच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा गैरफायदा शाळांकडून घेतला जात आहे. अनेक पालकांना तर शाळांमधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अनेक शाळांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया आटोपली असून, शाळांमध्ये ह्यनो अँडमिशनह्णचे फलकसुद्धा लावले आहे.
शहरातील काही शाळांनी परीक्षेपूर्वीच शाळा प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेशासाठी इच्छुक पालकांना अर्ज वाटप करून त्यांच्याकडून त्यांचे शिक्षण, आर्थिक परिस्थिती जाणून घेतली आणि त्यांना पंधरा दिवसांनंतर आम्ही तुम्हाला कळवू, असे सांगितले आहे.
२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून नामांकित शाळांना भरमसाठ डोनेशन मिळत नसल्याने, ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास शाळांनी नकार दिला आहे. मात्र, शहरातील काही शाळांना २५ टक्के प्रवेश प्रकिया राबवूनही गत चार वर्षांपासून शासनाकडून शिक्षण शुल्क न मिळाल्यानंतरही या शाळा २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यास प्राधान्य देत आहेत. शहरातील नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांनी शिक्षण घ्यावे, अशी गोरगरीबच नाहीतर आर्थिक बाजू मजबूत असणार्या पालकांचीही मनापासून इच्छा असते; परंतु काही शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबविणे बंद केल्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेकांनी शिक्षणाधिकार्यांकडे तक्रार नोंदविली आहे.
डोनेशन घेऊन दाखवितात २५ टक्के प्रवेश
२५ टक्के प्रवेश प्रक्रियेमुळे अनेक शाळांना भरमसाठ डोनेशन मिळत नसल्याने, शाळांनी नवीन शक्कल लढविली आहे. मागासवर्गीय समाजातील परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या पालकांच्या पाल्यांची जात प्रमाणपत्र गोळा करून त्यांना २५ टक्के प्रवेश प्रक्रियेनुसार प्रवेश दिल्याचे शाळा दर्शवितात आणि भरमसाठ डोनेशनही उकळतात. त्यामुळे अनेक गोरगरीब पालकांनी यासंदर्भात शिक्षणाधिकार्यांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु शिक्षण विभागाकडूनही तक्रारींची दखल घेण्यात येत नाही. नामांकित शाळांमध्ये आमच्या पाल्यांना प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी पालकांनी शिक्षणाधिकार्यांकडे केली आहे.
शाळांविषयी आदर व्यक्त करावा की संताप?
शाळेचे शुल्क तीन अंकी अन् डोनेशन मात्र पाच अंकी मागणार्या नामांकित शाळा अनेक आहेत. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून धडपड करीत असलेल्या गरजू पालकांची अक्षरश: लूट सुरू आहे, तर अनेक पालकांना प्रवेशासाठी झगडावे लागत आहे. ह्यशाळेत प्रवेश मिळेल मात्र डोनेशन कम्पलसरी आहेह्ण, असे वाक्य ऐकून शाळांविषयी आदर करावा की संताप व्यक्त करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.