तीन लाखांच्या तरतुदीतून २४ साड्या, प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 02:57 IST2017-04-02T02:57:43+5:302017-04-02T02:57:43+5:30

आर्थिक वर्षाच्या अखेरीस केवळ निधीची तरतूद आहे म्हणून अंगणवाडीसेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकांना २४ पुरस्कारांच्या रूपात २४ साड्या आणि प्रमाणपत्रांचे वाटप

24 saris, certificates distributed through three lakh provisions | तीन लाखांच्या तरतुदीतून २४ साड्या, प्रमाणपत्रांचे वाटप

तीन लाखांच्या तरतुदीतून २४ साड्या, प्रमाणपत्रांचे वाटप

अकोला, दि. १- आर्थिक वर्षाच्या अखेरीस केवळ निधीची तरतूद आहे म्हणून अंगणवाडीसेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकांना २४ पुरस्कारांच्या रूपात २४ साड्या आणि प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हा परिषदेच्या सभागृहात बुधवारी दुपारी करण्यात आले. पुरस्कार वितरणासाठी तीन लाख रुपये निधीची तरतूद होती, हे विशेष. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ऐनवेळी राबविलेला हा उपक्रम केवळ निधी खर्चासाठी झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. जिल्हा परिषद सभागृहात अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, माया कावरे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांच्यासह आठही प्रकल्पांचे बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी आदर्श अंगणवाडी-बालवाडीसेविकांना पुरस्कार वितरण केले जाते. त्यासाठी गेल्या काही वर्षांंंत सातत्याने प्रतिवर्षी तीन लाख रुपये तरतूद केली जाते. चालू वर्षातही तेवढीच तरतूद आहे. त्यातून प्रत्येक बालविकास प्रकल्पातून तीन पुरस्कार दिले जाते. त्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकेची निवड केली जाते. आठ प्रकल्पांतून २४ व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी मार्चच्या शेवटच्या दिवशी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप म्हणून एक साडी आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी मंचासह सभागृहात उपस्थित असलेल्यांची संख्या ५0 च्या आतच होती. या खर्चासाठी आता तरतूद असलेल्या तीन लाखांपैकी किती रक्कम खर्ची घातली जाते, हे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे.

Web Title: 24 saris, certificates distributed through three lakh provisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.