प्रशिक्षणाला २३३ कर्मचा-यांची दांडी
By Admin | Updated: September 29, 2014 01:46 IST2014-09-29T01:46:21+5:302014-09-29T01:46:21+5:30
अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातील २३३ कर्मचारी प्रशिक्षण वर्गास गैरहजर

प्रशिक्षणाला २३३ कर्मचा-यांची दांडी
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम या दोन मतदारसंघा तील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकार्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी घेण्यात आले. दोन्ही म तदारसंघातील २३३ कर्मचार्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली.
अकोला पूर्व मतदारसंघाचे प्रशिक्षण प्रमिलाताई ओक सभागृह, मेहरबानू कनिष्ठ महाविद्यालय येथे घेण्यात आले. तसेच अकोला पश्चिम मतदारसंघाचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ह्यडीपीसीह्ण सभागृह येथे पार पडले. अकोला पूर्व मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून एकूण १ हजार ४0२ अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी १३५ अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर होते. तसेच अकोला पश्चिम मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून १ हजार १९१ अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यापैकी ९८ अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर होते. दोन्ही मतदारसंघातील २३३ कर्मचार्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली.