महान धरणात २२.४२ टक्के जलसाठा
By Admin | Updated: July 28, 2014 01:55 IST2014-07-28T01:23:10+5:302014-07-28T01:55:05+5:30
सार्वत्रिक दमदार पावसाअभावी अद्याप लक्षणीय वाढ नाहीच.

महान धरणात २२.४२ टक्के जलसाठा
अकोला: रिमझिम पाऊस बरसत असला तरी, सार्वत्रिक दमदार पावसाअभावी अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठय़ात अद्यापही लक्षणीय वाढ झाली नाही. रविवारपर्यंत या धरणात २२.४२ टक्के जलसाठा उपलब्ध असून, दगडपारवा धरणातील जलसाठा लघुत्तम पातळीखालीच आहे.
रविवारी सकाळी १0 वाजेपर्यंत काटेपूर्णा धरणात २२.४२ टक्के, मोर्णा धरणात ३१.९५ टक्के, निगरुणा धरणात २१.८७ टक्के, उमा धरणात ९.४३ टक्के आणि वान धरणात ८३.३१ टक्के जलसाठा आहे. दगडपारवा धरणात जलसाठा उपलब्ध झाला नसल्याने या धरणातील जलसाठा लघुत्तम पातळीखालीच आहे.