कांद्याचे २00 कट्टे लंपास
By Admin | Updated: July 9, 2014 00:29 IST2014-07-09T00:29:48+5:302014-07-09T00:29:48+5:30
शेतकर्याच्या शेतामधून अज्ञात चोरट्यांनी कांद्याचे २00 कट्टे लंपास केल्याची घटना घडली.

कांद्याचे २00 कट्टे लंपास
तेल्हारा: तालुक्यातील बेलखेड शेतशिवारातील शेतकर्याच्या शेतामधून अज्ञात चोरट्यांनी कांद्याचे २00 कट्टे लंपास केल्याची घटना सोमवार ७ जुलैच्या मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बेलखेड येथील शेतशिवारात नरेंद्र पालीवाल यांचे फार्महाऊस आहे. त्यांनी यावर्षी पिकविलेला २00 कट्टे कांदा याच फार्महाऊसमध्ये ठेवला होता. कांद्याचे भाव वाढल्यानंतरच विकण्याच्या उद्देशाने त्यांनी हा कांदा ठेवला होता. सोमवार ७ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फार्महाऊसमधून जवळपास दीड लाख रुपये किंमत असलेल्या कांद्याचे २00 कट्टे लंपास केले. मंगळवारी सकाळच्या सुमारास नरेंद्र पालीवाल आपल्या शेतात गेले असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी सदर घटनेची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करीत भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल के ला. या प्रकरणी हेकाँ राजू इंगळे, पुढील तपास करीत आहेत. उल्लेखनीय बाब अशी, की गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह संपूर्ण तालुकाभरात चोरटे सक्रि य झाल्याच्या अफवा पसरल्यामुळे ग्रामस्थ रात्रभर जागरण करीत असतानाही हा प्रकार घडला.