अकोला-महू मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २00 कोटी
By Admin | Updated: February 27, 2015 01:41 IST2015-02-27T01:41:24+5:302015-02-27T01:41:24+5:30
रेल्वे अर्थसंकल्प; अकोल्यावर ‘प्रभू’कृपा.

अकोला-महू मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २00 कोटी
अकोला- यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्ष करणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी अकोल्यावर मात्र चांगलीच कृपा केली आहे. रतलाम-महू-खंडवा-अकोला या मार्गावर दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला गेज परिवर्तनाचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला आहे. अकोला ते महूपर्यंतच्या कामासाठी रेल्वेच्या अर्थसंकल्पात २00 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अजमेर ते काचीगुडा या नॅरोगेज मार्गाचे गेज परिवर्तनाला रेल्वे मंत्रालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर टप्प्याने या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. काचीगुडा ते अकोल्यापर्यंत नांदेड, पूर्णा मार्गे ब्रॉडगेजमध्ये या मार्गाचे परिवर्तन करण्यात आले. आता अकोला ते रतलामपर्यंतच्या मार्गाचे गेज परिवर्तनाचे काम सुरू आहे. रतलाम ते महूपर्यंतचे काम पूर्ण झाले असून, महू ते खंडवा आणि खंडवा ते अकोला या दोन टप्प्यात या मार्गाचे गेज परिवर्तन करण्यात येणार आहे. या कामासाठी सुरेश प्रभू यांनी यंदाच्या बजेटमध्ये भरीव निधीची तरतूद करून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना वाढदिवसाची भेट दिली आहे. गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना प्रभूंनी या मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी २00 कोटी रुपयांची तरतूद केली. आतापर्यंत या मार्गावर एवढय़ा मोठय़ाप्रमाणात निधी उपलब्ध झालेला नव्हता. यावेळी मोठी रक्कम मिळाल्याने गेज परिवर्तनाच्या कामाला गती मिळेल, असे खा. धोत्रे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. या मार्गावरील काम महूपर्यंत पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या कामासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे यावेळी मंजूर झालेल्या निधीतून अकोला-आकोटपर्यंतचे काम पूर्ण होणार असल्याने हा निधी या मार्गासाठी दिला जाईल, असा विश्वास खा. धोत्रे यांनी व्यक्त केला.