शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

 वऱ्हाडातील धरणात २० टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:54 IST

पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे

ठळक मुद्दे१८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघु मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ५ जुलैपर्यंत केवळ २० टक्केच जलसाठा संचयित झाला. ४ जून रोजी या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा होता.  म्हणजेच पावसाळ््याच्या मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली. या उन्हाळ््यात तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्'ातील १८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ९.५५ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट अद्याप संपले नाही. याच जिल्ह्यातील निर्गुणा, उमाव मोर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा २.७९, तर उतावळी धरणातील पातळी ३.१३ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ११.५२ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात २.२० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये ११.८५ टक्के, मन धरणात १०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. 

 वाशिम जिल्'ातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४६.२० टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील १०.७८ टक्क्याहून ३४.१७ टक्क्यावर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्'ातील दोन धरणात १ ते २ टक्के वाढ झाली. अमरावती जिल्'ातील उर्ध्व वर्धा धरणात केवळ ३४.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ४८.६७, अरुणावती १५.४८ तर बेंबळा धरणात १६.५९ टक्केच जलसाठा आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वाण धरणात गत एक महिन्यात जलसाठा वाढला नसून, गतवर्षीचा ५८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी