पाणीपुरवठा योजनेत २0 लाखांचा अपहार
By Admin | Updated: May 15, 2015 01:41 IST2015-05-15T01:41:28+5:302015-05-15T01:41:28+5:30
पिंपळखुटा येथील घटना; गुन्हा दाखल.

पाणीपुरवठा योजनेत २0 लाखांचा अपहार
खेट्री (जि. अकोला):: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत २0 लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी गुरुवारी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत २0११ ते २0१२ या कालावधीमध्ये योजनेची कामं करण्यात आली होती; मात्र ग्रामीण पाणीपुरवठा समितीने उपविभागीय कार्यालयाची परवानगी न घेताच बॅँकेतून पैसे काढण्याचा ठपका समितीवर ठेवण्यात आला. २0 लाख ६ हजार ४६४ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी बाळापूर उपविभागीय अभियंता राजेंद्र अमृतराव इंगळे यांनी चान्नी पोलीस ठाण्यात धाव घेतली. इंगळे यांनी सविस्तर तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्ष गयाबाई भगवान महाकर, सचिव परसराम गणपत वावकार यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२0 (फसवणूक), ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.