२0 शेतक-यांना मिळाला सौर कृषिपंपांचा आधार!
By Admin | Updated: June 6, 2016 02:38 IST2016-06-06T02:38:26+5:302016-06-06T02:38:26+5:30
अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली.

२0 शेतक-यांना मिळाला सौर कृषिपंपांचा आधार!
अतुल जयस्वाल/ अकोला
केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्हय़ांमध्ये शेतकर्यांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये अकोला जिल्हय़ासाठी एक हजार सौर कृषिपंपांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंंत ६८४ लाभार्थींंची निवड करण्यात आली आहे. यापैकी २0 शेतकर्यांच्या विहिरींवर सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत.
राज्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्हय़ांसाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिक वीज निर्मितीकरिता असलेल्या र्मयादा आणी वाढती मागणी, यामुळे वीज भारनियमन केले जाते. ग्रामीण भागात शेतकर्यांच्या कृषिपंपांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. विहिरींना पाणी असूनही केवळ विजेअभावी सिंचनात अडथळे येतात. यावर तोडगा म्हणून शेतकर्यांना अनुदानावर सौर कृषिपंप वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकर्यांना ७.५ अश्वशक्तीपासून ते ३ अश्वशक्ती क्षमतेचा सौर उज्रेवर चालणारा कृषिपंप देण्यात येतो. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. यासाठी लाभार्थी हिस्सा म्हणून शेतकर्याला केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागते. केंद्र सरकार ३0 टक्के, तर राज्य सरकार ५ टक्के अनुदान देते. उर्वरित ६0 टक्के रक्कम कर्जस्वरूपात उपलब्ध करून देणार असून, हे कर्ज महावितरण टप्प्याटप्प्याने फेडणार आहे. म्हणजे शेतकर्याला केवळ पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप मिळविता येतो. लाभार्थी शेतकर्यांच्या सातबारा उतारावर कर्जाचा बोजा लावला जाणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत महावितरणचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव म्हणून आहेत.