तेल्हारा तालुक्यात कोरोना रुग्णांची १८२ वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:52+5:302021-05-05T04:30:52+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढतच असून मृत्यूचेसुद्धा प्रमाण वाढले आहे. आज रोजी शहरात ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ...

182 corona patients in Telhara taluka! | तेल्हारा तालुक्यात कोरोना रुग्णांची १८२ वर!

तेल्हारा तालुक्यात कोरोना रुग्णांची १८२ वर!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढतच असून मृत्यूचेसुद्धा प्रमाण वाढले आहे. आज रोजी शहरात ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात १२६ आहेत असे एकूण १८३ रुग्ण आढळले तर कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. यात शहरातील ४ व ग्रामीण मधील ७ जणांचा समावेश आहे. ही आकडेवारी ३ एप्रिलपर्यंतची आहे. कोरोनाबाबत शासन व प्रशासन अनेकदा जनजागृती व कारवाई करीत असूनही नागरिक बिनधास्त वावरत असून अनेक दुकानदार लपूनछपून व्यवसाय करीत आहेत. नागरिकांनी खबरदारी न बाळगल्यास, कोरोनाकडे दुर्लक्ष केल्यास, तालुक्यातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे. बाजारात खरेदीसाठी गर्दी करू नये. शक्यतोवर घराबाहेर पडूच नये. घराबाहेर पडून घरातील सदस्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: 182 corona patients in Telhara taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.