राज्यात सात महिन्यांत १८ हजार नवे रूग्ण

By Admin | Updated: November 30, 2014 22:15 IST2014-11-30T22:15:55+5:302014-11-30T22:15:55+5:30

आज जागतीक एडस निर्मूलन दिन

18,000 new patients in seven months in the state | राज्यात सात महिन्यांत १८ हजार नवे रूग्ण

राज्यात सात महिन्यांत १८ हजार नवे रूग्ण

राजेश शेगोकार/बुलडाणा
बी पॉझीटिव्ह असे म्हटले की दिलासा मिळतो, सकारात्मक विचार करण्याचा संदेश मिळतो; मात्र हाच ह्यपॉझीटिव्हह्ण शब्द एचआयव्ही चाचणीतून समोर आला तर संपूर्ण आयुष्यच उद्धवस्त झाल्याची भावना होते. अशा एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांसाठी शासन अनेक सुविधा देत असली तरी रूग्णांचा आकडा वाढताच आहे. गत एप्रिल ते ऑक्टोबर २0१४ या सात महिन्यांच्या काळात राज्यात तब्बल १८ हजार रूग्ण नव्याने आढळले असून एडस् निमुर्लनासाठी अजूनही व्यापक जनजागृतीची गरज असल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखीत झाली आहे.
गत सात महिन्यांमध्ये सामान्य व गरोदर माता रूग्णांची तपासणी केली असता १८ हजार ३५ रूग्ण एचआयव्ही पॉझीटिव्ह आढळले आहेत. सामान्य रूग्णांध्ये एक लाख ११ लाख ६३ हजार ७१७ रूग्णांची तपासणी केली असता, त्यामध्ये १७ हजार १८३ रूग्ण पॉझीटिव्ह आढळले आहेत. १0 लाख ६५ हजार १0 गरोदर महिलांपैकी ८५२ महिलांना एचआयव्हीची लागण झाली आहे. गरोदर महिलांसाठी व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. नियमित तपासणीमध्ये उपचारही वेळेवर दिले जातात. त्यामुळे तपासणी केलेले रूग्ण व प्रत्यक्षात लागण झालेले रूग्ण यांचे गुणोत्तर कमी आहे; मात्र सर्वसामान्य रूग्णांच्या बाबतीत आकडेवारी चिंताजनक आहे.
एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबधित रूग्णाला एआरटी केंद्रावर उपचारासाठी यावे लागते; मात्र अनेकदा रूग्ण भितीपोटी किंवा बदनामीपोटी एआरटी केंद्रावर तपासणीसाठी येत नाही. त्यामुळे एचआयव्ही पॉझीटिव्ह रूग्णांची संख्या वाढतीच असल्याचे मत बुलडाण्याचे एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनी व्यक्त केले. रूग्णांनी योग्य उपचार घेतला तर त्यांना फायदा होतो व दैनंदिन जीवन जगतांना कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे अशा रूग्णांनी उपचाराकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: 18,000 new patients in seven months in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.