मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १८ वाहने अधिग्रहित!

By Admin | Updated: February 16, 2017 22:26 IST2017-02-16T22:26:52+5:302017-02-16T22:26:52+5:30

मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांचा शुक्रवारी संभाव्य अकोला दौरा.

18 vehicles for the Chief Minister's convoy! | मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १८ वाहने अधिग्रहित!

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १८ वाहने अधिग्रहित!

अकोला, दि. १५- महानगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी संभाव्य अकोला दौरा आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १८ वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत.
१८ वाहने अधिग्रहित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १८ वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. अधिग्रहित करण्यात आलेली वाहने १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत.

Web Title: 18 vehicles for the Chief Minister's convoy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.