पातूर तालुक्यात सोमवारी १८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:18 AM2021-04-06T04:18:26+5:302021-04-06T04:18:26+5:30

---------------------------- वीजचोरी करणाऱ्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई पिंपळखुटा : अकोला जिल्हा महावितरण विभाग ग्रामीण यांच्या आदेशानुसार परिसरात महावितरणकडून धडक ...

18 positive in Pathur taluka on Monday | पातूर तालुक्यात सोमवारी १८ पॉझिटिव्ह

पातूर तालुक्यात सोमवारी १८ पॉझिटिव्ह

Next

----------------------------

वीजचोरी करणाऱ्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई

पिंपळखुटा : अकोला जिल्हा महावितरण विभाग ग्रामीण यांच्या आदेशानुसार परिसरात महावितरणकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंर्तगत वीजचोरी करण्याऱ्या नऊ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पी.ए. गुहे यांनी केली. या वेळी वीज वितरणचे कर्मचारी मंगेश गवई, सुनील वानखडे, महेश राखोंडे, सुरज कवळे, योगेश राखोंडे व नीलेश ढेंगे आदी उपस्थित होते.

-------------------------------------

दुचाकी घसरल्याने २ जण जखमी

मूर्तिजापूर : कारंजा तालुक्यातील खर्डा येथील लग्न समारंभ आटोपून गावी दुचाकीने परत जात असताना कारंजा रस्त्यावरील जामठी फाट्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २ जण जखमी झाल्याची घटना ५ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान घडली.

राजेंद्र प्रल्हाद जंजाळ (वय ५२) व धनंजय नारायण जंजाळ (वय २६) (दोघेही राहणार राजना (पूर्णा) तालुका चांदुर बाजार) हे दोघे खेर्डा येथून लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी जात होते. जामठी खुर्दजवळ येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी अचानक घसरून अपघात घडला. त्यात राजेंद्र जंजाळ हा डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला, तर धनंजय किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच वंदे मातरम् आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी झालेल्या व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजेंद्र जंजाळ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविण्यात आले.

Web Title: 18 positive in Pathur taluka on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.