१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 02:06 PM2019-05-05T14:06:21+5:302019-05-05T14:06:28+5:30

१७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

 In 177 villages, the maintenance of water shortage was completed. | १७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

Next

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मे पर्यंत १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.
जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४४६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ५६९ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मेपर्यंत प्रत्यक्षात जिल्ह्यातील १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६९ गावांमधील पाणीटंचाई निवारणासाठी ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उपाययोजनांची अशी पूर्ण करण्यात आली कामे!
उपाययोजना                            गावे                 कामे
नवीन विंधन विहिरी                 ३४                    ३८
कूपनलिका                               ६९                    ७४
तात्पुरती पूरक नळ योजना       ०१                   ०१
खासगी विहिरींचे अधिग्रहण      ७१                   ८३
टँकरद्वारे पाणीपुरवठा             ०२                    ०२
........................................................................
एकूण                                      १७७                    १९८

‘या’ गावांत सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा!
जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त पुनोती बु. आणि देवदरी (वरखेड) या दोन गावांमध्ये ४ मेपासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

 

Web Title:  In 177 villages, the maintenance of water shortage was completed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.