१७ हजार रुपयांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: June 18, 2017 02:13 IST2017-06-18T02:13:06+5:302017-06-18T02:13:06+5:30

दुचाकीवर गुटख्याची वाहतूक करीत असलेल्या दोघांना हिवरखेड पोलिसांनी अटक केली.

17 thousand rupees gutkha seized | १७ हजार रुपयांचा गुटखा जप्त

१७ हजार रुपयांचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : दुचाकीवर गुटख्याची वाहतूक करीत असलेल्या दोघांना हिवरखेड पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटख्याची वाह तूक करण्यासाठी वापरलेली दुचाकीही जप्त केली. दुचाकी क्र.एमएच ३0 एके ४४0६ ने दोघे गुटखा घेऊन जात असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुटख्याचे २७0 पाकिटे किंमत १७ हजार व दुचाकी, असा ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई प्रभारी ठाणेदार शरद भस्मे, पोकॉ. गणेश धुर्वे, नीलेश बोरकुटे, अमर पवार यांनी केली.

Web Title: 17 thousand rupees gutkha seized