पश्चिम व-हाडात १७ टक्के निरक्षरता
By Admin | Updated: April 8, 2015 01:38 IST2015-04-08T01:38:26+5:302015-04-08T01:38:26+5:30
साक्षरतेचे आव्हान; ज्ञानाच्या गंगेपासून ९ लाख लोक वंचीत.

पश्चिम व-हाडात १७ टक्के निरक्षरता
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असताना सुद्धा पश्चिम वर्हाडात १७ टक्के म्हणजे सुमारे ९ लाख ५२ हजार ५७३ नागरीकांना शिक्षणाचा गंध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नागरिकांना साक्षर करण्यासाठी शासनाकडून तसेच स्वयंसेवी संस्थांकडून विविध उपाययोजना राबविल्या जातात. निरक्षरता दूर करण्यासाठी शासनाच्यावतीने प्रौढ शिक्षण मोहिमेद्वारे स्वतंत्र विभाग स्थापन करून ग्रामीण भागात केंद्रही स्थापन करण्या त आलेली आहेत. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय साक्षरता मिशन, साक्षरता अभियान यासारखे उपक्रमही चालविले जात आहेत. ज्ञानाची गंगा तळागळातील प्रत्येक घटकापर्यंंत पोहचविण्यासाठी अनेक समाज सुधारकांनीही युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत. आज सर्व जग इंटरनेटने व्यापलेले असताना आजही शिक्षणापासून अनेक घटक वंचीत आहेत. पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तिनही जिल्ह्यातील सुमारे १७ टक्के नागरीक निरक्षर आहेत. पश्चिम वर्हाडा त एकूण ५६ लाख ३ हजार ३७0 लोकसंख्या आहे. त्यापैकी ४६ लाख ५0 हजार ७९७ नागरीक साक्षर असून, सुमारे ९ लाख ५२ हजार ५७३ नागरीकांना अद्यापपर्यंंत शिक्षणाचा गंध नाही.
*पश्चिम वर्हाडातील चित्र
जिल्हा लोकसंख्या साक्षर निरक्षर
बुलडाणा २५,८८,0३९ ८२ टक्के १८ टक्के
अकोला १८,१८,६१७ ८७ टक्के १३ टक्के
वाशिम ११,९६,७१४ ८0 टक्के २0 टक्के