पहिल्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात १७ नामांकन

By Admin | Updated: July 14, 2015 02:05 IST2015-07-14T02:05:56+5:302015-07-14T02:05:56+5:30

ग्रामपंचयत निवडणुक वाशिम जिल्ह्यात पहिल्या दिवशी तीन तर अकोला जिल्ह्यात पहिला दिवस निरंक.

17 nominations in Buldhana district on the first day | पहिल्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात १७ नामांकन

पहिल्या दिवशी बुलडाणा जिल्ह्यात १७ नामांकन

अकोला- ऑगस्ट महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठीच्या नामांकन अर्ज सादर करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी बुलडाणा जिल्ह्यात १७ नामांकन अर्ज दाखल झाले तर वाशिम जिल्ह्यात केवळ तीन नामांकन अर्ज दाखल झाले. अकोला जिल्ह्यात एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही. अकोला जिल्ह्यात २२0 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होत असून ४८ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होऊ घातल्या आहे. आज नामकंन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामंकन अर्ज दाखल झाला नाही. बुलडाणा जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होत असून २५ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक होऊ घातल्या आहेत. यापैकी खामगाव तालुक्यात १७ नामाकंन अर्ज दाखल झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी केवळ तीन नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. वाशिम, रिसोड, मालेगाव, मानोरा व कारंजा या पाच तालुक्यातून एकाही उमेदवाराने पहिल्या दिवशी नामांकन दाखल केले नाही. मंगरुळपीर तालुक्यातून शेलुबाजार एक आणि कंझरा दोन असे एकूण तीन नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: 17 nominations in Buldhana district on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.