शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

मिनरल वॉटरसाठी दररोज होतो १६.५ लाख लीटर पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:00 IST

अकोला : अकोला शहरात मिनरल वॉटर कॅन विक्रीसाठी दररोज साडेसोळा लाख लीटर पाण्याचा जमिनीतून उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

- संजय खांडेकर अकोला : अकोला शहरात मिनरल वॉटर कॅन विक्रीसाठी दररोज साडेसोळा लाख लीटर पाण्याचा जमिनीतून उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.लग्नसमारंभ असो की कोणताही कार्यक्रम त्यात मिनरल वॉटर कॅनचा उपयोग सर्रास होताना दिसतो. शुद्ध पाण्याच्या जनजागृतीमुळे शहरासह आता गावातही काही प्रमाणात मिनरल वॉटर कॅनचा वापर सुरू झाला असून, मिनरल वॉटरची कॅन विकत घेणे शहरवासीयांच्या अंगवळणी पडले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय असो किंवा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्थळ असो, प्रत्येक ठिकाणी मिनरल वॉटर कॅन हमखास दिसते. शुद्ध पाण्याची जनजागृती आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अनेकांनी मिनरल वॉटर प्लांटचा उद्योग सुरू केला आहे. ज्यांच्या बोअर्सला भरपूर पाणी लागले, त्यांनी दोन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करून हा उद्योग सुरू केला आहे. शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू असतानादेखील ११० मिनरल वॉटर प्लांटच्या संचालकांना कोणताही परिणाम झालेला नाही. हे सर्व उद्योजक दररोज सरासरी ३०० वॉटर कॅनची ३० रुपये प्रतिकॅ न विक्री करतात. त्यामुळे दररोज हे उद्योजक एक लाख रुपयांची कमाई करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्रत्येक प्लॉन्टवर ६० टक्के पाण्याची नासाडीअकोल्यात असलेले ११० प्लॉन्टधारकांना दररोज, प्रत्येकी तीनशे मिनरल वॉटरच्या कॅन विकाव्या लागतात. त्यासाठी दररोज भूगर्भातून साडेसोळा लाख लीटर पाण्याचा उपसा केला जातो. साडेसोळा लाख लीटर पाण्याचा उपसा केल्यानंतर त्यातून केवळ साडेसहा लाख लीटर पाणी शुध्द निघते. यातील ६० टक्के क्षारयुक्त असल्याने त्याची नासाडी होते. साडेसहा लाख लीटर पाण्याच्या शुद्धीसाठी, दररोज १० लाख लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर येत आहे.वर्षभरात वाढले ३० वॉटर प्लॉन्टमागील वर्षी अकोल्यात ८० मिनरल वॉटर प्लांट होते. त्यात यंदा ३० प्लांटची भर पडली आहे. त्यामुळे आता अकोल्यात ११० मिनरल वॉटर प्लांट कार्यरत आहेत. कौलखेड, मलकापूर, खेतान नगर, सोमठाणा, उमरी, खोलेश्वर, रणपिसे नगर, कुंभारी, डोंगरगाव, बाभूळगाव, निमकर्दा, एमआयडीसी परिसरात हे उद्योग आता सुरू झाले आहेत.

३३ हजार मिनरल वॉटर कॅनची दररोज अकोल्यात विक्री लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडून येणारी कॅनची मागणी लक्षात घेता ११० प्लॉन्टधारकांकडून अकोल्यात दररोज ३३ हजार मिनरल वॉटर कॅनची विक्री होते. एक प्लॉन्टधारक सरासरी किमान तीनशे कॅनची विक्री करतो. मागणीनुसार पुरवठा करणाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याचेही समोर येत आहे.

टीडीएसचा           घोळ कायम  पिण्याच्या पाण्यात तीनशेपर्यंत टीडीएस असले पाहिजे; मात्र पाण्याची चव चांगली येण्यासाठी पाण्यातील टीडीएस कमी करण्याचे प्रयोग अकोल्यासह सर्वत्र सुरू झाले आहे. आरोग्यासाठी ही बाब अत्यंत घातक आहे. पॅकिंग बॉटल्समधील ड्रिंकिंग वॉटरमध्ये सर्वात कमी टीडीएस राहत असल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाईMineral Waterमिनरल वॉटर